जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशन आयोजित यंदाची पहिली जिल्हा मानांकन स्पर्धा सानेगुरुजी वाचनालयाच्या हॉलमध्ये पार पडली. स्पर्धेत एकूण १० गटात एकूण१०० खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धा या दिनांक सहा व सात जुलै २०१९ दरम्यान पार पडल्या. सोहम सरोदे, महेश चौधरी, पुष्कर टाटिया सब ज्युनिअर, ज्युनिअर गटात विजेते मिळाले.
सर्व विभागातील स्पर्धेचा अंतिम निकाल १० वर्षाआतील मिश्र मिड जेट १) स्वरदा साने -विजेता, २) आरुष जाधव -उपविजेता, ३) भूमिज सावदेकर तृतीय १२ वर्षाखालील कॅडेट मुले: १) प्रेषीद पाटील-विजेता, २) निखिलेश सोनवणे-उपविजेता १४ वर्षे सब ज्युनिअर मुले: १) महेश चौधरी -विजेता, २) पुष्कर पाटील -उपविजेता, १४ वर्षे सब ज्युनिअर मुली: १) श्रुती केसकर-विजेता, २) मैत्रयी खाचणे-उपविजेता १७ वर्षे ज्युनिअर मुले: १)पुष्कर टाटीया-विजेता, २)दक्ष जाधव-उपविजेता, १७ वर्षे ज्युनिअर मुली: १ श्रुती केसकर-विजेता, २) मिस्त्री कोठारी-उपविजेता २१ वर्षे युवा मुली: १) स्नेहा अग्रवाल-विजेता, २) श्रुती केसकर -उपविजेता २१ वर्षे युवा मुले: १) सोहम सरोदे-विजेता, २) पुष्कर टाटिया-उपविजेता प्रौढ गट: १) भरत राऊत- -विजेता भुसावळ, २) तुषार जोशी – -विजेता भुसावळ स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू १)शिवम झवर (युवा खेळाडू) २)निलेश गोसावी (युवा खेळाडू))
बक्षीस वितरण समारंभाला प्रेसिडेंट कॉटेज संचालक सौरभ,वर्षा आडवाणी, जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद देशपांडे, जैन इरिगेशनचे क्रिकेट प्रशिक्षक संदीप दहाड, संघटनेचे सहसचिव राजू खेडकर, ऍड.विक्रम केसकर, जैन स्पोर्टसचे रवींद्र धर्माधिकारी जळगाव जिल्हा टेबल टेनिस असोसिएशनचे सचिव विवेक आळवणी, प्रमुख पंच शैलेश जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शैलेश जाधव, ऍड.विक्रम केसकर, अमित चौधरी, डॉ.श्रीधर त्रिपाठी अनिकेत आळवणी यांनी परिश्रम घेतले.