Home क्राईम टी.व्ही.अभिनेत्री रुही सिंहचा मित्रांसह मद्यपान करून धिंगाणा ; गुन्हा दाखल

टी.व्ही.अभिनेत्री रुही सिंहचा मित्रांसह मद्यपान करून धिंगाणा ; गुन्हा दाखल


 

pjimage 10

 

 

मुंबई (वृत्तसंस्था) टीव्ही अभिनेत्री रुही सिंह हिने मद्यपान करुन धिंगाणा घातल्याची घटना सोमवारी रात्री घडली. रुही सिंह हिच्याविरोधात पोलिसांसोबत मारहाण आणि मद्यपान करून गाडी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तिच्यासोबत असलेल्या राहुल सिंह आणि स्वप्नील सिंह या तिच्या मित्रांनाही याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

सोमवारी रात्री उशिरा बांद्रा येथील एका मॉलजवळ रुही सिंह आणि तिच्या चार मित्रांनी धिंगाणा घातला. यानंतर मॉलच्या सुरक्षारक्षकांनी पोलिसांना कळवले. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांशी सुद्धा त्यांनी हुज्जत घातली. याप्रकरणी एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुही सिंह, राहुल आणि स्वप्नील यांनी दोन पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहेत. याप्रकरणी राहुल आणि स्वप्नील यांनी अटक करण्यात आली तर रुही सिंह आणि इतर दोघांना जाण्यास परवानगी देण्यात आली.

पोलीस उपायुक्त परमजीत सिंह दहिया यांनी सांगितले की, ‘घटनास्थळावरुन घरी जाताना रुही सिंहने पार्किंगमधील गाड्यांना धडक दिली. ती दारुच्या नशेत होती, म्हणून पोलिसांनी तिच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंग गुन्हा दाखल केला आहे.’


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound