मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भारतीय शास्त्रांनी आता कर्करोगाच्या परिणामकारक प्रतिकारासाठी सायरप अर्थात द्रव औषधी तयार केली असून याचा कॅन्सर रूग्णांना मोठा लाभ होणार आहे. तर हे द्रावण केमोथेरपीला पर्याय ठरण्याची शक्यता आहे.
कर्करोगाच्या रुग्णांसाठी पहिले सिरप तयार करण्यात भारतीय शास्त्रज्ञांना यश आले आहे. त्याला प्रीवेल असे नाव देण्यात आले आहे. टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि ऍडव्हान्स्ड सेंटर फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर येथील संशोधकांच्या चमूला कर्करोगाच्या रुग्णांच्या उपचारासाठी भारतातील पहिले सिरप (ओरल सस्पेंशन) तयार करण्यात यश आले आहे. यात मर्केप्टोप्युरीन-६ म्हणजेच एमपी-६ हे रसायन असून ’प्रीव्हल’ असे नाव देण्यात आले आहे. ही औषधी बंगळुरू येथील आयडीआरएस लॅबच्या सहकार्याने तयार केले आहे. हे औषध रक्त कर्करोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू शकते. हे पारंपारिक टॅब्लेटसाठी एक प्रभावी पर्याय बनू शकते, विशेषत: मुलांच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये याचा परिणामकारक वापर होणार आहे.
सर्व प्रकारच्या कर्करोगाच्या उपचारांमध्ये मेरकॅपटोप्युरीनचा वापर केला जातो. हे अँटिमेटाबोलाइट्स नावाच्या औषधांच्या श्रेणीशी संबंधित आहे जे कर्करोगाच्या पेशींच्या वाढीस प्रतिबंध करते. सध्या कर्करोगग्रस्त मुलांना कुस्करून गोळ्या द्याव्या लागतात. त्यांना द्रावण स्वरूपातील औषधी देणे अधिक परिणामकारक ठरेल. प्रीवेलला औषध नियामक सीडीएससीओ कडून मंजुरी मिळाली आहे. तसेच याचे मूल्य हे टॅब्लेटच्या तुलनेत कमी असेल अशी माहिती देखील देण्यात आली आहे.