फैजपूर प्रतिनिधी । येथील धनाजी नाना महाविद्यालयात क.ब.चौ. उ.म.वि.जळगाव अंतर्गत आंतर महाविद्यालयीन तलवारबाजी (महिला/पुरुष) स्पर्धा नुकतीच घेण्यात आली.
या स्पर्धेत जळगाव विभागातील एकूण 7 महाविद्यालयातील 27 महिला व 45 पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ.पी.आर.चौधरी, जळगाव विभाग सचिव प्रा. भालोदकर, प्रा. प्रविण कोल्हे, सुरवाडे, जिमखाना समिती चेअरमन प्रा.डॉ.सतिष चौधरी, प्रा.डॉ.जगदीश पाटील इंग्रजी विभाग प्रमुख इत्यादी उपस्थित होते.
मान्यवरांनी व्यक्त केले मनेागत
कार्यक्रमाच्या उद्धाटन प्रसंगी डॉ.अजित थोरबोले यांनी सांगितले की, खेळ कोणताही असो आपण केव्हा सफल होणार जेव्हा आपण नियमीत सराव करणार. जसे आपण बघत आहे कि, जे जुने खेळाडू आहेत, त्यांचेच नाव आपल्या डोळ्यासमोर असतात किंवा ते बरेच दिवस खेळ खेळतात. आपल्याला नविन खेळाडूंचे नाव ऐकायला सुद्धा येत नाही. कारण आता जे खेळाडू आहे, ते सरावाकडे दुर्लक्ष्य करतांना दिसतात. प्रत्येक खेळाडूसाठी आवश्यक आहे कि, त्यांनी सरावासोबत त्यांनी किमान एक तास तरी अभ्यास करायला पाहिजे. खेळातून रोजगार मिळतो, हे ही आपल्याला माहित आहे. तेव्हा जर खेळात सातत्याने सराव केला व पदक मिळेल व शासनामार्फत नोकरी सुद्धा मिळेल त्यासाठी आपल्याला कोणत्याही परीक्षेची गरज नाही. खेळाच्या प्राविण्यावरच आपल्याला रोजगार उपलब्ध होईल त्याकरीता खेळात करीयर करण्याची संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे. त्यासाठी आपण नियमीत सराव करुन अभ्यास करावा त्यासोबतच सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य पी.आर.चौधरी यांनी सांगितले कि, हि भूमी स्वातंत्र्य संग्रामाची आठवण आहे, या ठिकाणाहून आपण सकारात्मक उर्जा घेऊन, आपले जीवन यशस्वी करावे असे सांगितले. तसेच सर्व खेळाडूना आमच्या महाविद्यालयात उपलब्ध असलेल्या सोई सुविधांचा लाभ घेता येईल, असे देखील सांगितले. त्याच बरोबर महाविद्यालयाने क्रीडा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा अव्हाल सांगितला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.डॉ.जी.एस.मारतळे यांनी केले. प्रस्ताविक डॉ. सतिष चौधरी यांनी केले तर आभार युवराज गाढे यांनी मानले.
स्पर्धेचे विजेते
या स्पर्धेत पुरुष गटामध्ये जळगाव येथील मुळजी जेठा महाविद्यालय विजयी, के.सी.ई.सोसाईटीचे शिक्षण शास्त्र व शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय उपविजयी आणि धनाजी नाना महाविद्यालय तृतीय स्थानी राहीले. तर महिला गटामध्ये मुळजी जेठा प्रथम स्थानी, जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालय द्वितीय स्थानी तर धनाजी नाना महाविद्यालय तृतीय स्थानी राहिले.
पारितोषिक वितरण
या स्पर्धेच्या पारितोषक वितरण प्रसंगी जिमखाना समितीचे चेअरमन प्रा.डॉ.सतिष चौधरी अध्यक्ष स्थानी होते व प्रमुख पाहुणे सचिव जळगाव विभाग प्रा.डॉ.पी.आर.चौधरी उपस्थित होते. पंच म्हणुन रोहन भावसार यांनी कार्य केले. तसेच तांत्रिक समितीचे सदस्य म्हणून डॉ.पी.आर.चौधरी यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज गाढे, आर.डी.ठाकुर, तुषार सपकाळे आणि सर्व खेळाडू मित्र आदिंनी सहकार्य केले.