जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व केसीई सोसायटीचे शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षण शास्त्र महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वयंसिद्धा प्रशिक्षण शिबिरास सोमवार 16 रोजी प्रारंभ झाला.
शिबिराचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.आर. राणे यांच्याहस्ते झाले. याप्रसंगी युवती सभा सचिव प्रा.डॉ. सुनीता नेमाडे, प्रा.केतन चौधरी तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होता. या शिबिरातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे तंत्र शिकवले जाणार आहेत, त्यात जुडो, तायक्कादो, कराटे, कुशू यांचे प्रशिक्षण राजेंद्र जंजाळे देणार आहेत. हे प्रशिक्षण 8 दिवसांचे असून यास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागामार्फत अनुदान महाविद्यालयास प्राप्त झाले आहे. प्रशिक्षणाचे आयोजन व नियोजन प्राचार्य डॉ.ए.आर. राणे, प्रा.डॉ. सुनीता नेमाडे व कर्मचारी वर्ग यांनी केलेले आहे.