स्वराज्य आणि मित्र परिवार मंडळाने सप्तश्रुंगी मातेचे मंदिर केले स्वच्छ

वरणगाव प्रतिनिधी । नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने वरणगाव येथील स्वराज्य आणि मित्र परिवार मंडळाने शहरातील साडेतीन शक्तीपीठ आई सप्तश्रृंगी माता मंदिर स्वच्छ केले.

दोन  दिवसांवर नवरात्र उत्सव सुरू होतोय.अनेक देवस्थान 7 तारखेला प्रशासन सुरू करत आहे. आज वरणगांव शहरातील साडेतीन शक्तीपीठ आई सप्तश्रृंगी माता मंदिर वरणगांव,नागेश्वर मंदिर परिसरात गेली चार वर्षांपासून वरणगांव शहरातील अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविणारे स्वराज्य मित्र मंडळ नारीमळा नगर व मित्र परीवार दरवर्षी नवरात्री उत्सव सुरू व्हायच्या अगोदर मंदिराची साफसफाई करतात.

आज स्वराज्य मित्र मंडळ व मित्र परीवाराने मंडळा तर्फे स्वखर्चाने पाण्याचे टँकर आणून,पाण्याची मोटर लावून, मंदिरात असलेल्या देवीच्या मूर्ती पाण्याने स्वच्छ धुऊन व मंदिराच्या पायऱ्या व परिसर झाडुने झाडून,पुसुन स्वच्छ-साफ सफाई केली.या प्रसंगी स्वराज्य मित्र मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते विजय डोयसे, महेश सपकाळे, विशाल पाटील, वृषभ झोपे, मुकेश राजपुत, अमर बढे, भूषण पाटील, नाना भंगाळे, वासू कोलते, भैय्या बाविस्कर, रोहन जोगी या सर्वांनी मिळून साफसफाई केली.

देवस्थानचे पुजारी यांनी सहकार्य केले. वरणगांव शहर व परिसरातील नागरिकांकडून स्वराज्य मित्र मंडळाने चांगला उपक्रम राबविला या बद्दल त्यांचे कौतुक होत आहे.मंडळाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या विषयी माहिती घेतली असता त्यांनी सांगितले आम्ही गेली चार वर्ष झाले मंदिराची साफसफाई करतो.त्यांची फक्त एकच विनंती होती प्रशासनाला मंदिराची व परिसराची नियमितपणे साफ सफाई झाली पाहिजे.

 

Protected Content