श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे शहीद जवानांच्या वीर पत्नींचा सत्कार (व्हिडीओ )

Untitled

जळगाव (प्रतिनिधी )  पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात ४२ भारतीय जवान शहीद झाले होते. त्यात महाराष्ट्रातील दोन जवानांचा समावेश होता. पाकिस्तानच्या या भ्याड कृतीविरुद्ध लढा देण्यासाठी आणि भारतीय सैनिकांच्या समर्थनार्थ जळगाव शहरात श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे भव्य रॅली काढण्यात आली होती. त्याचवेळी राज्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून सहवेदना निधी संकलित करण्याचा उपक्रमही सुरु करण्यात आला होता. संकलित झालेला हा निधी त्या वीरपत्नींना शुक्रवार १२ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता कांताई सभागृहात होणा-या कार्यक्रमात अर्पण करून त्यांचा सत्कारही करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी दिली.

 

याचवेळी मेजर जनरल जी.डी.बक्षी यांचे “दहशदवाद कल-आज और कल” याविषयावर मार्गदर्शन करणार आहेत.  प्रखर राष्ट्रवाद, पाकिस्तानच्या कुरापती आणि भारतीय सैनिकांची शौर्यगाथा सांगणारे आणि मनामनात देशभक्तीची ज्योत प्रज्ज्वलित करणारे हे देशभक्तीपर व्याख्यान असणार आहे पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मलकापूर येथील शहीद संजयसिंह राजपूत आणि चोरपांगरा येथील नितीन राठोड यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाने हाती घेतलेल्या सहवेदना निधी संकलन उपक्रमात आजपर्यंत सुमारे १२ लाख ८ हजार ४५८ रुपये ग. स. सोसायटी कडून १० लाख रुपये असे मिळून जवळपास २२ लाख रुपयांचा निधी संकलित झाला आहे. या उपक्रमातून जळगावकर केवळ सैनिकाच्या सोबतच नाही, त्यांच्या कुटुंबियांचीही काळजी घेतात हे यातून दिसून येत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी जळगाव जनता बँकचे विशेष सहकार्य लाभत आहे. याकार्यक्रमाला समस्त जळगावकर नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनावणे यांनी केले आहे.

 

Add Comment

Protected Content