जळगाव प्रतिनिधी । खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचालित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात १३ व १४ डिसेंबर २०१९ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन “युवास्पंदन २०१९” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांना चालना मिळण्यासाठी महाविद्यालयात वर्षभर अनेकविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांचाच एक भाग म्हणजे हे स्नेहसंमेलन आहे. या स्नेहसंमेलनानिमित्त दिनांक 10, 11, 12 डिसेंबर रोजी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. 13 डिसेंबर रोजी स्नेहसंमेलन उदघाटन होणार असून यादिवशी फूड फेस्टिवल खाना-खजाना, हास्यप्रधान खेळ, उत्स्फूर्त भाषण व काव्यवाचन स्पर्धा, विविध छंद स्पर्धा,ललित कला प्रदर्शन, मेहंदी स्पर्धा, गरबा राऊंड आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
14 डिसेंबर रोजी अंताक्षरी स्पर्धा, गीत गायन व वादन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, याबरोबरच पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन महाविद्यालयाचे समन्वयक प्रा.एस.ओ. उभाळे, उपप्राचार्य प्रा.करुणा सपकाळे, सर्व समन्वयक व स्नेहसंमेलन प्रमुख डॉ.संतम्मा वर्गीस यांनी केले आहे.