रावेर तालुक्यात शिधापत्रिका प्रकरणात कागदपत्रांच्या पूर्ततेचे आवाहन

reshan card

रावेर, प्रतिनिधी | येथील तहसील कार्यालयात आलेल्या नव्या शिधापत्रिका व जुन्या शिधापत्रिकांच्या विभक्ती करणाची प्रकरणे तपासणी करून त्यातील त्रुटी असलेल्या प्रकरणांची यादी संबंधित प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयात नोटीस बोर्डावर लावण्यात आलेली आहे. संबंधितानी ही यादी बघून आगामी १५ दिवसात कागदपत्रांची पूर्तता करून ती येथील अव्वल कारकून यांच्याकडे समक्ष येवून सादर करावीत. असे आवाहन येथील तहसिलदारांनी केले आहे.

 

तहसिल कार्यालयातील संगायो / इंगायो शाखेमध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजना (संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी योजना) बाबत अनेक प्रकरणे सादर झालेली आहेत. सदर प्रकरणाची या कार्यालयामार्फत तपासणी करण्यात आली असुन सदर प्रकरणामध्ये काही त्रुटी आढळुन आल्या आहेत, या बाबत सदर प्रकरणाची यादी प्रत्येक गावातील तलाठी कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर दि.30 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तरी आपण या यादी मधील प्रकरणाची सद्यस्थिती पाहुन सदर प्रकरणामध्ये आढळन आलेल्या त्रुटी किंवा अपुर्ण असलेले कागदपत्र यांची पुर्तता तहसिल कार्यालय रावेर येथे नायब तहसिलदार संगायो यांचेकडे समक्ष सादर करावी . तसेच तहसिल कार्यालयातील संगायो/इंगायो शाखेमध्ये विशेष अर्थसहाय्य योजनेअंतर्गत मजुर प्रकरणाची यादी तलाठी कार्यालयात प्रसिध्द करण्यात आलेली आहे तरी सदर यादीमध्ये एखादया लाभार्थ्याबाबत काही अक्षेप असल्यास तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार संगायो यांचेकडे समक्ष आक्षेप सादर करावा. वरील प्रकरणी कोणीही मध्यस्थामार्फत कागदपत्रे सादर करु नयेत, तसेच सदर प्रकरणाबाबत कोणीही जर पैशांची मागणी करीत असेल तर या बाबत तहसिलदारांकडे तक्रार नोंदवावी. असेही त्यांनी कळवले आहे.

Protected Content