Home Cities मुक्ताईनगर स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांचा शेतकऱ्यांतर्फे सत्कार

स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांचा शेतकऱ्यांतर्फे सत्कार

0
37

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगांव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या समस्या, अडचणी कायम शासकीय पातळीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे वेगवेगळ्या प्रकारच्या लक्षवेधी आंदोलनाच्या माध्यमातून मांडतात म्हणून शेतकरी बांधवांप्रति असलेल्या जिव्हाळा निमित्ताने अंतुर्ली येथे शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी कृषी केंद्र चालकांच्या संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष शेतकरी पुत्र विनोद तराळ, दिनेश दादा पाटिल तालुकाध्यक्ष कॉंग्रेस पक्ष, शेख भैयाजी, सुनील दादा पाटील,अंतुर्ली चे उपसरपंच गणेश तराळ, प्रल्हाद धायले, सलीम नामदार, शरद तराळ, विजय सोनार, अमित देशमुख, राहुल पाटील, योगेश देशमुख, वसंत साळुंखे, सौरभ सपकाळ आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound