चोपडा, प्रतिनिधी । येथील रेशन विभागात मासिक रेशन हजारो टन माल शासनाकडून गोडाऊनला येतो. मात्र गोर गरीब लाभार्थ्यांपर्यत पोहचतांना लाखोंचे रेशन गायब होत असून गरिबांचा घास हिसकावणाऱ्या दोषींना निलंबित करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
रेशन विभागात मासिक रेशन २५ ते ३० हजार टन माल शासनाकडून येतो मात्र, गोर गरिबांपर्यंत मात्र पोहोचतंना लाखो रुपयाचा रेशन गायब होते. हे लाखो रुपये कोणाच्या खिशात जातात गरिबांचा घास हीसकवणाऱ्या दोषींवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
तसेच प्राधान्य कुटुंबाचा लाभार्थी म्हणून शिक्का असूनही त्यांना रेशन देण्यात येत नाही त्यांना रेशन देण्यात यावे. विभक्त कार्डधारकांना लवकरात लवकर कार्ड देण्यात यावे. लाभार्थी योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थींना शिक्का मारून देण्यात येत नाही त्या कामासाठी अर्थपूर्ण मागणी करण्यात येते. पुरवठा अधिकारी कधीच भेटत नाही त्याकरिता गोरगरिबांचे आतोनात हाल होत आहे. ६० ते ६५ वर्षाचे वृद्ध व्यक्तींचे हाताचे ठसे येत नाही तरी त्यांना मार्च महिन्या पासून धान्य मिळत नाही लवकर मिळावे. उडीद मुग पंचनाम्यात बरोबर कापसाचे सुद्धा पंचनामे करावे. भरडधान्य योजनेअंतर्गत शासनाने मका खरेदी केली आहे तरी शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले नाही. आदी मागण्यांसाठी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील , चोपडा पिपल बँकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, चोपड़ा पीपल्स बँकेचे व्हाईस चेअरमन प्रवीण गुजराथी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अमृतराज सचदेव, जिल्हा उपाध्यक्ष संजय कानडे, पं. स. सदस्य बापू खैरनार, शेतकी संघ चेअरमन एल. एन. पाटील, यशवंत पाटील, शहरध्यक्ष शरद देशमुख, नौमान काजी नगरसेवक, अकील जहागीरदार नगरसेवक, तालुका अध्यक्ष मनोज पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सनी सचदेव, जिल्हा सरचिटणीस प्रफुल्ल स्वामी, शहर कार्याध्यक्ष प्रफुल्ल पाटील, शहर चिटणीस मोसिन शेख, अनिल वारुळे, प्रमोद पाटील, निलेश राजपूत, लक्ष्मण पाटील, संदिप कोळी, मोहसीन शेख, दुर्गादास पाटील, दीपक पवार, मजहर अली, संकेत जैन, अनुराग पाटील, जितेंद्र विसावे, विनोद पाटील, जयेश सोनवणे, जयेश धनगर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.