जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दशरथ नगरात भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये हिसकावून नेल्याप्रकरणी अटक केलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय-३२, रा. तांबापुरा) याला बुधवारी १२ जून रोजी दुपारी तीन वाजता न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र त्यानंतर तो परिसरातून पोलिसांची नजर चुकवून पसार झाला.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2024/06/advt-aaj.jpg)
भोलासिंग बावरी याने मंगळवार ११ जून रोजी भंगार विक्रेत्याला मारहाण करून तीन हजार रुपये काढून तो पसार झाला होता. त्याला शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोउनि मुबारक तडवी, पोकॉ राहुल पाटील, अनिल कांबळे, राहुल घेटे यांनी त्याला अटक केले होते. त्याला बुधवार, १२ जून रोजी दुपारी ३ वाजता त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर बाहेरून तो पोलिसांची नजर चुकवून पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांनी दिली.
बावरी याच्यावर या पूर्वीही एमआयडीसी, रामानंद नगर, जिल्हा पेठ पोलिस ठाणे तसेच भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे या ठिकाणी घरफोडी, खंडणी, गंभीर दुखापत करणे, विनयभंग असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.