दहशत मजवत पोलिसांना धमकी देणाऱ्या संशयीताला अटक

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील नवीपेठ परिसरात असलेल्या काळे मटण हॉटेल जवळ पोलिसांना बघून दारुची बाटली स्वत:च्या डोक्यात फोडून, फुटलेली बाटली पोलिसांना धाकवून त्यांची नोकरी घालविण्याची धमकी देणाऱ्या तनवीर उर्फ तन्या शेख रहीम (वय २०, रा. गेंदालाल मिल, सीटी कॉलनी) याच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी शुक्रवार १४ जून रोजी रात्री १० वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहर पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यात फरार असलेला संशयित तनवीर उर्फ तन्या शेख हा शहरातील नवीपेठेत हातात दारुची बाटली घेवून येणाऱ्या जाणाऱ्यांना शिवीगाळ करीत दहशत माजवित होता. दरम्यान, याबाबतची माहिती पेट्रोलिंगवर असलेल्या शहर पोेलिसांना मिळाली. त्यानुसार पोहेकॉ उमेश भांडारकर, भास्कर ठाकरे, पोकॉ रतनहरी गिते यांनी १३ रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास मिळून आला. पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता, त्याने मुझे पकडा तो मैं बाटली सर मैं मार लुंगा, तुम्हारी कोर्ट मैं कंम्पलेंट दुंगा और नोकरी खाँ जाऊंगा अशी धमकी देवू लागला. दरम्यान, पोलिसांनी अशा परिस्थितीत देखील त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता, तनवीर उर्फ तन्या याने हातातील दारुची बाटली स्वत:च्या डोक्यात मारुन घेत दुखापत करुन घेतली.

फुटलेली दारुची बाटली पोलिसांना दाखवून त्यांना धमकी देत होता. दरम्यान, पोलिसांनी तनवीर उर्फ तन्या याला ताब्यात घेतले असता, तो पोलिसांसोबत झटापट करु लागला. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उमेश भांडारकर हे करीत आहे.

Protected Content