दोन गावठी पिस्तूलासह संशयिताला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात दोन गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (वय-२९) रा. गेंदालाल मील, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

 

एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात बुधवार १६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या इराद्याने घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.ना. सुधिर सावळे, पो.ना. हेमंत कळसकर आणि पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे  सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, पो.कॉ. साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील हे लागलीच मासूमवाडी येथील आठवडे बाजार येथे रवाना झाले. याठिकाणी संशयित आरोपी अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली हा संशयास्पद हालचाली करत असतांना आढळून आल्याने त्याला पाठलाग करून अटक केली.

दरम्यान त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ २ गावठी पिस्तूल त्याच्याकडे आढळून आले. सदरील गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या इराद्याने त्यांनी आणले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीर गुन्हा दाखल करण्यात आला. आज न्यायालयातील न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता संशयिताला शनिवार १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील करीत आहे.

Protected Content