भुसावळात पुन्हा एकदा एकाचा खून; तरूणाला वार करून संपविले

भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका रोड चौफुलीवर रात्री एकावर शस्त्राने वार करून त्याचा खून करण्यात आल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत वृत्त असे की, शहरातील खडका रोड चौफुलीवर रात्री दहाच्या सुमारास शेख अल्तमश शेख रशीद (वय २०, रा. बाबला हॉटेल जवळ, भुसावळ ) या तरूणावर अज्ञात मारेकर्‍यांनी हल्ला चढविला. त्याच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा असल्याचे आढळून आले. उपचारासाठी नेले जात असतांनाच त्याचा मृत्यू झाला. मारेकर्‍यांना शस्त्रांनी वार करून त्याला संपविले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

दरम्यान, या तरूणाला कुणी तरी पूर्व वैमनस्यातून संपविल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत माहिती मिळताच डीवायएसपी गजानन राठोड यांच्यासह बाजारपेठ पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

Protected Content