चोरीच्या दोन दुचाकीसह संशयिताला अटक

चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या दोन दुचाकीसह संशयित आरोपीला चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रांजणगाव येथील अलीम कुतुबुद्दीन टकारी (वय-३७) यांची यांचे (एमएच १९ डीएक्स ६२१७) ही दुचाकी मध्यरात्री ३ मे रोजी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली होती. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान संशयित आरोपी रतन दगडू अहिरे (वय-४१) रा. रांजणगाव याने दुचाकी चोरी केल्याची माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली.

त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक लोकेश पवार, सहायक फौजदार राजेंद्र साळुंके, पोहेकॉ नितीन सोनवणे, शंकर जंजाळे, मनोज पाटील, संदीप माने, संदीप पाटील यांनी कारवाई करत संशयित आरोपी रतन अहिरे याला अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहेत. याप्रकरणी संशयित आरोपी रतन अहिरे यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नितीन सोनवणे करीत आहेत.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!