जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील न्हावे या गावामध्ये एका शेतकऱ्याचे नांगरटी करण्याचे ट्रीलर मशीन अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. या प्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये कुठलाही धागादोरा मिळत नसतांना अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी छडा लावत गावातीलच संशयित आरोपीला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.
खंडा भगा शिंदे (रा. न्हावे, ता. चाळीसगाव) यांचे न्हावे शेतशिवारातील शेत गट नंबर ५६ येथुन शरद भास्करराव पाटील (वय-35 वर्षे,रा. ढोणे, ता. चाळीसगाव) यांचे ६० हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी नांगरटी करण्याचे ट्रीलर मशीन लाल रंग दिलेला कोणीतरी अज्ञांत व्यक्तीने चोरी करुन नेले होते. त्याबाबत शरद भास्करराव पाटील यांनी दिलेल्या फिर्यादवरुन चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे २६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीताची काहीएक माहीती नसतांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीसांनी तपासाचे चक्र फिरवुन अवघ्या ३ दिवसात गुप्त बातमीच्या आधारे संशयित समाधान उर्फ शाम भिमराव पिलोरे (वय ३५ वर्षे, रा. न्हावे, ता. चाळीसगाव) यास निष्पन्न केले. त्यास २९ रोजी सदर गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्यातील चोरी झालेले रुपये लोखंडी नांगरटी करण्याचे ट्रीलर मशीन त्यास वर निळा रंग व त्याचे खाली खरचटलेले ठिकाणी लाल रंग दिसत असलेला तसेच त्यास एकुण ९ फण असुन त्याचे मागील फणाजवळ टॅपलिंगच्या पट्टीजवळ वेल्डींग केलेले असे आढळून आले होते.
सदरचे ट्रीलर मशीन चोरी करण्यासाठी वापरलेले ट्रैक्टर रुपये ३, लाख रूपये किंमतीचे एक सोनालिका कंपनीचे ट्रॅक्टर असा एकुण ३ लाख ६० रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे. सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, सहायक पोलीस अधिक्षक अभयसिंह देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक प्रविण दातरे, पो.हे.कों प्रविण सपकाळे, पो.हे.कॉ. जयेश पवार व पो.हे.कॉ. ओंकार सुतार सर्व नेमणुक चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.