रावेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तीन मालकांच्या जाचाला कंटाळून एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रावेर शहरात घडली होती. याप्रकरणी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी फरार झाल्या असल्याचे समोर आले आहे.
भारती ज्वेलर्सचे तिघ मालक करण गणवानी अनुराग गणवानी महेश गनवाणी यांच्या छळाला कंटाळुन किशोर सैतवाल याने काल आत्महत्या केली होती. त्याची आईच्या फिर्यादी वरुन काल तिघ मालकाविरुद्ध रावेर पोलिस स्थानकात आत्महत्येला कारणीभुत म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. रात्री रावेर पोलिस भारती ज्वेलर्सचे तिघे मालकांच्या घरी गेले असता. ते घरातून आधीच पसार झाले होते.