जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सागर पार्क समोर सुसाट वेगाने येणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील दुभाजकावरील विजेच्या खांब्यावर आदळून समोरून येणारी रस्त्यावर उभी असलेली मालवाहू रिक्षाला धडक देवून तीनवेळा पटली झाल्याची घटना गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर पार्क समोरील पेट्राल पंपाजवळ मालवाहू रिक्षा क्रमांक (एमएच ०३ एएच ८५३६) ही रात्री बंद झाल्याने बंदावस्थेत उभी होती. त्यामुळे रिक्षा चालक प्रकाश राजपूत यांनी रस्त्याच्याकडेला पार्किंग केली. दरम्यान गुरूवार ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता महाबळकडून आकाशवाणी चौकाकडे भरधाव कार जात होती. चालकाचे वेगावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यावरी दुभाजकाला आदळल्याने ईलेक्ट्रीक खांब्यावर जावून धडकली. त्यानंतर कारने राँगसाईडला पलटी घेत नादुरुस्त रस्त्याच्याकडेला लावलेल्या मालवाहू रिक्षाला धडक दिली. यामुळे ही मालवाहू रिक्षा उलटली. या विचित्र अपघातामध्ये रिक्षाच्या कॅबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान या घटनेबाबत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.