जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जयश्री महाजन यांनी आज जळगाव शहरातील विविध भागात प्रचार रॅली काढण्यात आली. जळगाव शहराच्या सर्वांगीण विकासाला प्रथम प्राधान्य देऊन शहरातील समस्यांचे निवारण करण्याचे वचन महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री महाजन यांनी दिले आहे.
जयश्री महाजन यांनी सकाळी प्रभात चौकातील दक्षिणमुखी हनुमानाचे दर्शन घेऊन व आपल्या शहराच्या सर्वांगिण विकासाला, तरुणांना इथेच रोजगार मिळवून द्यायला तसेच जळगावकर नागरिकांना सुरक्षित रस्ते मिळवून देण्यासाठी सुरु केलेल्या कार्याला बळ देण्याचे आवाहन केले. यावेळी शहरातील एम.जे.कॉलेज परिसर, विठ्ठल रुख्मिणी मंदीर, लाठिज परिसर, दक्षिणमुखी हनुमान मंदीर, हिरकणी ब्यूटी पार्लर, रामदास कॉलनी, ओंकारेश्वर मंदिर परिसर, सेंट जोसेफ हायस्कूल परिसर, साईबाबा मंदीर, गुलमोहर कॉलनी, लक्ष्मीनगर, पोस्टल कॉलनी, महादेव मंदीर, वल्लभनगर, धांडेनगर, फोर स्टार रेसिडेन्सी, धांडे नगर, गोदावरी चक्की, दत्तमंदीर, विवेकानंद नगर या मार्गे जावून अनुराधा रेसिडेन्सी येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला. या प्रचार रॅली दरम्यान त्यांचे परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत करत, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात यंदा परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या प्रचार फेरीदरम्यान ठिकठिकाणी जयश्री महाजन यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या प्रचार फेरीत शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद आबा तायडे, उपमहानगर प्रमुख मानसिंग सोनवणे, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, उपमहानगर प्रमुख जया तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, प्रकाश पाटील, सलीम खाटीक, पिंटू तायडे, किरण भावसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर युवक महानगराध्यक्ष रिंकू चौधरी, रहीम तडवी, पूनम राजपूत, प्रमोदभाऊ झंवर, ओगल पांचाळ, संजू महाजन, इंद्रसेन पारेख, देविदास पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.