मुंबई वृत्तसंस्था । भारतीय क्रिकेटर आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्यावर आज शस्त्रक्रिया करण्यात आली. डे-नाईट कसोटी सामन्या दरम्यान त्याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीची चाचणी केल्यावर बोटाला फ्रॅक्चर असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्या बोटावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.
भारतीय संघाने कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर झालेल्या पहिल्या डे-नाईट कसोटी सामन्यात बाजी मारली. टी-२० मालिकेत २-१ असा विजय मिळवल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने २-० असे निर्विवाद वर्चस्व राखत आयसीसीच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. दरम्यान, भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा पहिला डाव केवळ १०६ धावांवर आटोपला. यानंतर भारतीय कर्णधार विराट कोहली याने दमदार शतक ठोकत भारताला भक्कम आघाडी मिळवून दिली. मात्र या सामन्या दरम्यान यष्टीरक्षक वृद्धिमान साहा याच्या उजव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्या दुखापतीची चाचणी केल्यावर बोटाला फ्रॅक्चर असल्याचे समजले. त्यामुळे त्याच्या बोटावर मुंबईतील रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली.