परभणीत काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी ; भाजपला पहिला धक्का

congress logo

परभणी प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून परभणीतील पाथरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे सुरेश वरपूडकर विजयी झाले आहेत. वरपूडकर यांनी भाजपचे विद्यमान आमदार विजय फड यांचा पराभव केला. आता अंतिम आकडेवारी आणि निवडणूक आयोगाची औपचारिक अधिकृत घोषणाच बाकी आहे.

परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. या विधानसभा मतदारसंघांपैकी जिंतूर आणि गंगाखेड या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. परभणी मतदारसंघात मागील 30 वर्षांपासून शिवसेनेचे आमदार राहिलेले आहेत. मागील निवडणुकीत मोहन फड हे पाथरी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर आमदार मोहन फड यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत खासदार संजय जाधव यांच्याशी वितुष्ट आल्याने त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे तर महानगर पालिका काँग्रेस राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पाथरी, जिंतूर, पालम नगरपालिका राष्ट्रवादीच्या तर गंगाखेड काँग्रेसच्या ताब्यात आहे. सेलू, मानवत आणि सोनपेठ या नगरपालिका भाजपच्या, तर पूर्णा, मानवत ह्या दोन नगरपालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. 9 पैकी 5 पंचायत समित्या आघाडीच्या ताब्यात आहेत तर 4 युतीच्या ताब्यात आहेत.

Protected Content