अतांत्रिक बंधार्‍यांमुळे चोपडा तालुका तहानलेला- खानापूरकर

चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात ३२६ बंधारे तरी तालुका पाण्याने तहानलेला याचं कारण,बंधार्‍यांचे अतांत्रिकदृष्टया बांधकाम झाले असल्याने पाणी टंचाई जाणवत असल्याचे परखड प्रतिपादन जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी केले. ते तालुक्यातील वेले येथील कार्यक्रमात बोलत होते.

तालुक्यातील वेले येथे जलमित्र आर.डी. पाटील व सागर बडगुजर यांनी सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शन शिबिराचे वेले येथील बालकाश्रमात आयोजन केले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी शहरातील जेष्ठ धन्वंतरी डॉ विकास हरताळकर होते. सुरेश खानापूरकर यांनी आपल्या मनोगतात त्यांनी विविध पावर पॉईंट,स्लाइड च्या माध्यमातून त्यांनी माहिती दिली.उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, चोपड्यात एवढे पाणी आहे की ते टँकरने पाणी दुसरीकडे पाठवता येईल .महाराष्ट्रात परंपरागत योजना राबविल्या तरी टँकर सुरू आहेत तर ते काम कुचकामी आहे. आपण ७०वर्षात प्यायला सुद्धा पाणी देऊ शकलो नाही ही शोकांतिका आहे. शेतीला पाणी नाही बाहेर मुलाला नोकरी नाही म्हणून शेतकरी आत्महत्या होत आहे.
पाऊस पडल्याबरोबर जमिनीत मुरवला गेला पाहिजे पाणी अडवायला आपण असमर्थ आहोत आपण अतांत्रिक पद्धतीने पाणी उपसा करतो .काही नद्या सोडल्या तर बाकी सर्व नद्या हंगामी आहेत.धरणाचे पाणी सिंचनाऐवजी पिण्यासाठी वापरावे लागते. शिरपूर तालुक्यात मागील दोन दशकात ७०कोटी रुपये पाणी वाचविण्यासाठी खर्च केला.त्यामुळे दोन वर्षे पाणी नसले तरी शिरपूर तालुक्यात टंचाई निर्माण होणार नाही कारण शिरपूर तालुक्याचे आमदार अमरीश पटेल यांनी कोट्यवधी रुपये पाण्यासाठी खर्च केल्याने तिथे हे शक्य झाल्याचे प्रतिपादन सुरेश खानापूरकर यांनी केले.

दरम्यान, याप्रसंगी सुरेश खानापूरकर यांनी पाणी समस्येवर उपाययोजनाही सांगितल्या. ते म्हणाले की, उपलब्ध पाण्याचा अतिशय शहाणपणाने वापर करावा. उगमापासून संगमापर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पाणी अडविले पाहिजे. हंगामी नदी नाले आठमाही बारमाही केले पाहिजे. कोरडया विहिरींचे पुनर्भरण, लहान-लहान बंधारे बांधणे आवश्यक असून दोन बंधार्‍यातीलअंतर ३००ते ४००मीटर असावे. आपण जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे काही दिवस मंदिरे बांधणे व भंडार्‍यांचे आयोजन थांबवून बंधारे बांधणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.

Add Comment

Protected Content