चाळीसगाव प्रतिनिधी । येथे संवाद यात्रेनिमित्त आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत आपल्या पक्षाला साथ देण्याचे आवाहन केले.
शहरातील राजपूत मंगल कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी चाळीसगावकरांशी संवाद साधला. याप्रसंगी माजी आमदार राजीव देशमुख, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, प्रवीण पटेल, भोजराज पुन्शी, अशोक खलाणे, दिलीप चौधरी, मीनाक्षी निकम, कल्पना पाटील, कल्पिता पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टिका केली. त्या म्हणाल्या की, नोकर्या जातात तेव्हा गुन्हेगारी वाढते आणि आज देशात गुन्हेगारी वाढली आहे. सत्ता नसली तरी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले. सरकारमधील मंत्री पूरग्रस्तांच्या भेटीचे नावाखाली सेल्फी काढतात. मी जर मुख्यमंत्री असते तर त्या मंत्र्यांचा राजीनामा घेतला असता असे सांगून त्यांनी ना. गिरीश महाजन यांना टोला लगावला.
https://www.facebook.com/supriyasule/videos/527205834697548