रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तीन महीने उलटे तरी रावेर तालुक्यात रेशन दुकानांद्वारे साखर वाटप झाली नाही यामुळे लाभार्थीमाधून नाराजीचा सूर उमटत आहे. पुरवठा निरिक्षक डी.के.पाटील रेशन दुकानांद्वारे सारख वाटप सुरु असल्याचा दावा करीत करीत आहे. याकडे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
खुल्या बाजारात साखर चाळीस रुपये प्रती किलोच्यावर गेली असून सर्वसाधारण गरीब कुटुंबाच्या घरात गोडवा निर्माण व्हावा यासाठी शासन रेशन दुकानांद्वारे स्वस्त दरात साखर उपलब्ध करून देते परंतु तीन महीने उलटले तरी अंत्योदयच्या रेशन लाभार्थीना साखर मिळाली नाही. यामुळे प्रचंड नाराजीचा सुर उमटत आहे.
तालुक्यात १० हजार साखरेचे लाभार्थी वंचित
रावेर तालुक्यात अंत्योदय रेशन कार्ड धारक १० हजार ५५१ आहे.या सर्वांना जानेवारी,फेब्रुवारी,आणि मार्च महीन्याची साखर मिळाली नसल्याचे लाभार्थी सांगतात तर पुरवठा अधिकारी डी के पाटील साखर वाटप सुरु असल्याचा दावा करीत आहे.याकडे वरीष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत असुन अंत्योदय लाभार्थीनी सुध्दा आपल्या संबधित रेशन दुकानदारा कडून तीन महिन्याची साखर घेऊन जाण्याची गरज आहे.
गोडाऊनवर २९२ क्विंटल साखर उपलब्ध
दरम्यान रावेर तालुक्याची २९२ क्विंटल साखर केव्हाचीच उपलब्ध झाली आहे. यापैकी सावदा गोडाऊनवर १०२ क्विंटल तर रावेर गोडाऊनवर १९२ क्विंटल साखर शासना कडून मिळाली असुन रेशन दुकानांद्वारे वाटप सुरु असल्याची माहिती पुरवठा निरिक्षक डी.के.पाटील यांनी दिली आहे.