अर्थमंत्र्यांनी सादर केलेला अतिरिक्त अर्थसंकल्प राज्यातील जनतेला न्याय देणारा : डॉ कुंदन फेगडे

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील शेतकरी, तरूण, महिला व आर्थिक दुर्बल घटकांनासह सर्वसामान्यांना न्याय देणारा हा राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेला शेवटचा अतिरिक्त अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रीया यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे युवा कार्यकर्त डॉ. कुंदन फेगडे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारने येणाऱ्या काही दिवसात लागलीच होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सादर केलेला शेवटचा दहावा २०२४ ते २०२५ वर्षासाठीचा अतिरिक्त अंतरिम अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केला आहे. या अर्थसंकल्पात देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी आपल्या देशातील सर्वसामान्यांना जनतेला जे न्याय देण्याचे आश्वासन दिले होते त्या आश्वासनाची पुर्तता करणारा हा महायुती राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला असुन आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी लाडकी बहीण योजनासह शेतकऱ्यांना मोफत वीज व तरुणांना आणी सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांसह राज्यातील चार ही घटकांसह राज्यातील सर्वसामान्या जनतेला न्याय देणारा हा अर्थ संकल्प असल्याची प्रतिक्रिया यावलचे माजी नगरसेवक व भाजपाचे कार्यकर्ते डॉ कुंदन फेगडे यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content