जळगाव (प्रतिनिधी) सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे तापमानात वाढ होऊन उकाडा वाढायला लागला आहे.त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील रस्ते सुनसान होतात. आगामी काही दिवसांत तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आतापासूनच घशाला पडलेली कोरड मिटविण्यासाठी नागरिक थंडपेयांचा आधार घेत असल्याने थंडपेयांच्या दुकानांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपासून तापमानात हळू-हळू वाढ होतेय. उन्हाचा चटका व उकाड्याचा दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून त्यामुळे शहरातील रस्ते दुपारी सुनसान होतात. दिवसा बाजारपेठेतही शुकशुकाट असतो. त्यामुळे लहान-मोठ्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे. दरम्यान, बदलत्या वातावरणाचा शरीरावर परिणाम होत असून,ताप, सर्दी-खोकला, यासारखे आजार वाढत आहेत.