Home क्राईम सावखेडा येथील कर्जबाजारी तरुणाची विष घेऊन आत्महत्या

सावखेडा येथील कर्जबाजारी तरुणाची विष घेऊन आत्महत्या


mukesh patil
 

जळगाव (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील सावखेडा येथील एका 32 वर्षीय तरुणाने विष प्राशन करत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. याबाबत यावल पोलिस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुकेश मंगल पाटील, असे मयत तरुणाचे नाव आहे.

 

याबाबत माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा येथील मुकेश मंगल पाटील (वय 32) यांनी एका फायनान्स कंपनीकडून गृहकर्ज आणि आणि शेतीसाठी ‘विकासो’चे कर्ज काढले होते. मात्र उत्पन्नाची कुठलेही साधन नसल्यामुळे कर्ज फेडू शकत नसल्यामुळे मुकेश सतत विवंचनेत होता. आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास घरी कोणी नसताना मुकेशने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. दरम्यान, मुकेशची पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा साळवे येथे लग्नासाठी तर आई काहीतरी कामानिमित्त घराच्या बाहेर गेलेल्या होत्या. शेजारच्या नागरिकांना माहित पडल्यानंतर मुकेशला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अधिक बिकट झाल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी रवाना झाले. परंतु दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मुकेशचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी आई आणि चार वर्षाचा मुलगा असा परिवार आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound