Home Cities अमळनेर लिंगपिसाट सासर्‍याच्या शरीरसुखाच्या मागणीमुळेच ‘त्या’ महिलेची आत्महत्या

लिंगपिसाट सासर्‍याच्या शरीरसुखाच्या मागणीमुळेच ‘त्या’ महिलेची आत्महत्या

0
43


अमळनेर प्रतिनिधी । सासर्‍याने शरीरसुखाची मागणी केल्यामुळेच शहरातील भावना पाटील या महिलेने आत्महत्या केल्याच्या उघडकीस आले असून संबंधीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, शहरातील आर. के. नगर भागातील भावना दीपक पाटील (वय ३२ ) या महिलेने शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजेपुर्वी स्वत:च्या राहत्या घरी छताला बांधलेल्या झोक्याच्या दोरीने गळफास घेऊन
आत्महत्या केली होती. याबाबत जितेंद्र साहेबराव पवार यांनी अमळनेर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र याबाबत पोलिसात मयत भावना हिचा भाऊ नरेंद्र संभाजी पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून याबाबत मयत भावना हिचे सासरे प्रल्हाद उत्तम पाटील हे सुनेकडे शरीरसुखाची मागणी करत असत त्यामुळे कंटाळून भावना हिने आत्महत्या केली असल्याचा आरोप केला आहे. याबाबत आधीच पती दीपक प्रल्हाद पाटील यांस अटक करण्यात आली आहे. तर आता सासरे प्रल्हाद उत्तम पाटील तसेच सासू प्रमिलाबाई प्रल्हाद पाटील, नणंद लीना भटू पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतीसह चार जणांवर भादंवि कलम ३०६, ३४, ३५४,४९८ अ, ३४ प्रमाणे दरा दाखल करण्यात आला आहे. तर यातील तीन जण फरार झाले आहेत. याबाबत पुढील तपास आय. प्रकाश सदगीर व पो.हे.कॉ.प्रभाकर पाटील हे करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound