कर्नाटक विधान परिषद उपसभापतींची आत्महत्या

बंगळुरु – कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती आणि जेडीएस नेते एसएल धर्मगौडा यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रेल्वे रुळावर धर्मगौडा यांचा मृतदेह आढळून आला आहे. तसेच घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट देखील सापडली आहे.

चिक्कामगलुरुच्या कडुर येथील रेल्वे रुळावर एसएल धर्मगौडा यांचा मृतदेह मिळाला आहे. तसेच त्याठिकाणी पोलिसांना एक सुसाईट नोटही सापडली आहे. विधानपरिषदेत 15 डिसेंबर रोजी काँग्रेस सदस्यांनी एस एल धर्मेगौडा यांना धक्काबुक्की करण्यात आली होती. तसंच त्यांना खुर्चीवरुन ढकललं होतं. धर्मेगौडा या घटनेने अतिशय दु:खी होते. धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचा मृतदेह दोन तुकड्यांमध्ये चिकमंगळुरुमधील कादूरजवळच्या रेल्वे रुळाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. कदूर पोलिसांच्या माहितीनुसार, धर्मेगौडा यांच्या मृतदेहाशेजारी सुसाईड नोटही सापडली आहे. यामध्ये 15 डिसेंबर रोजी सभागृहात काँग्रेस सदस्यांनी केलेल्या मारहाणीमुळे दु:खी असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते एच डी देवेगौडा यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे. कर्नाटक विधान परिषदेचे उपसभापती एसएल धर्मगौडा यांची आत्महत्या ही अत्यंत धक्कादायक घटना असल्याचं म्हटलं आहे. तसेच धर्मगौडा हे अतिशय सभ्य आणि शांत व्यक्ती होते असं एच डी देवेगौडा यांनी म्हटलं आहे.

Protected Content