जळगाव प्रतिनिधी । मेहरूण येथील विवाहितेने राहत्या घरात पतीसह सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सायंकाळी ६ वाजता उघडकीला आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कोमल चेतन ढाकणे (वय-२४) रा. विश्वकर्मा नगर, मेहरूण जळगाव असे मयत विवाहितेचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, कोमल ढाकणे ह्या पती चेतन ढाकणे आणि सासू यांच्यासह राहतात. कोमल यांनी आज ९ सप्टेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. तिला खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. पतीसह सासू यांच्याकडून होणार्या शारिरीक व मानसिक छळाला कंटाळून कोमल हिने आत्महत्या केल्याचा आरोप कोमलचे वडील प्रविण शामराव पाटील रा. मेहरुण यांनी केला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांची कारवाई सुरु होती.