कळमसरे येथील कर्जबाजारीतून शेतकऱ्याची गळफास घेवून आत्महत्या

अमळनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे येथील ६५ वर्षीय वृध्दाने शेतातील सततची नापिकी आणि कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत मारवड पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विष्णू रामदास चौधरी (वय-६५) रा. कळमसरे ता. अमळनेर असे गळफास घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, विष्णू चौधरी हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. पत्नी, मुलगा, सुन यांच्यासह शेतीचे काम करतात. मंगळवारी ८ फेब्रुवारी रोजी नित्य नियमानुसार मंदीरावर जावून सर्वांची विष्णू चौधरी यांनी भेट घेतली. कामानिमित्त मुलगा आणि पत्नी बाहेरगावी गेले होते. त्यांनी त्यांच्या पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये जावून दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. दुपारी जेवणासाठी घरी आले नसल्याने त्यांची शोधाशोध केली असता त्यांनी पिठाच्या गिरणीच्या स्टोअर रूममध्ये गळफास घेतल्याने निदर्शनास आले.

शेतातील सततच्या नापीकी आणि डोक्यावर तीन लाखांचे कर्ज या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांकडून समजते. त्यांना तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरानी मृत घोषित केले.

विष्णु चौधरी हे गावात मनमिळावू कष्टकरी असल्याने त्यांनी आपल्या एकुलता एक मुलाला उच्चशिक्षित केले होते. मात्र सदयस्थितीत नोकरी सर्वसामान्य माणसाला सहज नसल्याने त्यांचा शेती व्यवसायावर अवलंबून होते. त्यांच्या पत्नी आणि मुलाला ही घटना समझताच त्यांचा आक्रोश केला. यावेळी गावात शोककळा पसरली होती व गावात चुल पेटल्या नाहीत. याप्रकरणी देवीदास चौधरी यांच्या ख़बरीवरुन मारवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार सुनील तेली करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मोठा भाऊ नथ्थू चौधरी, मुलगा विकास, सुन नातवंडे व तीन मुली असा परीवार आहे.

 

 

 

Protected Content