शहरात प्रौढ व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रामेश्वर कॉलनीजवळील एमडीएस कॉलनीत राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार 9 जुन रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास उघडकीस आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगावातील राज शाळेजवळ, एमडीएस कॉलनी रामेश्वर कॉलनी परिसरात आपल्या कुटुंबियांसह येथे वास्तव्याला असणारे 50 वर्षीय गणेश बळीराम भावसार हे गुरुवार, दि. 9 जून रोजी दुपारी घरी एकटे होते. गणेश भावसार यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे कुटुंबीय सायंकाळी साडेसहा वाजता घरी आले तेव्हा त्यांनी गळफास घेतल्याचे उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

शेजाऱ्यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content