सम्राट कॉलनीतील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सम्राट कॉलनी परिसरातील २७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण अशोक जाधव (वय-२७) रा. न्यू सम्राट कॉलनी जळगाव हा कुटुंबियासह राहतो.  मोलमजुरी करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. कौटुंबिक वादामुळे त्यांची पत्नी ह्या गेल्या चार ते पाच महिन्यांपासून माहेरी निघून गेल्या होत्या. त्यामुळे लक्ष्मण जाधव आहे नैराश्य होते. सोमवारी २७ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची उघडकीला आले. सायंकाळी आई शर्मिलाबाई घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. गल्लीतील राहणारा योगेश परदेसी याने मृतदेह खाली  जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रावणी हुंबे यांनी मयत घोषीत केले.  आज मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. लक्ष्मण जाधव यांच्या पश्चात पत्नी रूपाली, चार वर्षाचा मुलगा प्रणव, आई शर्मिलाबाई, राम व शुभम हे दोन भाऊ आणि विवाहित बहीण असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Protected Content