जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील अजिंठा चौफुली येथील न्यू महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनीचे पेपर रद्दी दुकानात अचानक आग लागल्याची घटना १ जून रोजी मध्यरात्री १ वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती अखेर सोमवारी ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, अब्दुल नबी शेख गणी वय-५२ रा. सुप्रीम कॉलनी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून पेपर रद्दी विक्री करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे अजिंठा चौफुली येथे न्यू महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी नावाचे पेपर रद्दीचे दुकान आहे. दरम्यान १ जून रोजी मध्यरात्री १ वाजता त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. या आगीत रद्दीने भरलेला ट्रक क्रमांक एमएच १९ जे २७० हा जळून खाक झाला आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर ही आग विझवण्यात आली. याप्रकरणी अखेर सोमवारी ३ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलिसात अकस्मात आगेची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील करीत आहे.