नेत्यांची महापुरुषांशी तुलना केल्याबद्दल जळगावात निषेध

jalgaon nishedh

 

जळगाव, प्रतिनिधी | गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची गृहमंत्री अमित शाह यांच्याशी तुलना केल्याचा येथील काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या एका निवेदनातून निषेध केला आहे.

 

या दोन्ही गोष्टीमुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. यापुढे कोणीही अशाप्रकारे तुलना करु नये, यासाठी प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. शंतनू नारखेडे, विनोद देशमुख, अमोल कोल्हे व प्रशांत फाळके आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

Protected Content