भालोद येथील न्यू.इंग्लिश स्कूलमध्ये यशवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मानवाची प्रगती करायची असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही यासाठी स्वर्गीय लोकसेवक मधुकरराव चौधरी यांनी शिक्षणाची दालने उभे केले. ती परंपरा कायम ठेवत आमदार शिरीष चौधरी यांनी शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. या दृष्टिने आज १९२२ साली स्थापन झालेल्या सेकंडरी एज्युकेशन सोसायटी भालोद, ही संस्था स्वर्गीय तोताराम चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही स्थापन केली. शतकाची वाटचाल असणाऱ्या संस्थेची खूप मोठी प्रगती झाली. अनेक विद्यार्थी या संस्थेने घडविले. या संस्थेचे योगदान लक्षात घेऊन आज ५ सप्टेंबर रोजी मधूस्नेह शिक्षण संस्था परिवाराच्यावतीने शिक्षक दिनानिमित्त न्यू. इंग्लिश स्कूल भालोद येथे यशवंत विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

आज ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाज घडविण्याचे काम करत असणाऱ्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे. आपले कर्तव्य समजून आज त्या शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी केला तसेच १० वि १२ वी व महाविद्यालयातील ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन करतो. त्याला प्रोत्साहित केले पाहिजे. त्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला या कार्यक्रमा प्रसंगी सोबत सेकंडरी एज्युकेशन सोसायटी, भालोद संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष अनिल चौधरी, चेअरमन लिलाधर चौधरी, व्हा. चेअरमन मोहन चौधरी, संचालक नितीन चौधरी, लिलाधर चौधरी, किशोर महाजन, मधुकर परतणे, बापू पाटील, गोटू नेमाडे, प्रभातदादा चौधरी, व्ही. आर. पाटील, ज्ञानेश्वर बढे, प्राचार्य, के.जी.कोल्हे, मुख्याध्यापक डी.व्ही. चौधरी, प्राथमिक मुख्याध्यापिका निलवंती बोरोले व शिक्षक, शिक्षकेतर-कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content