Home क्राईम सहा अल्पवयीन मुलांचा यशस्वी शोध; रावेर पोलीसांची कामगिरी

सहा अल्पवयीन मुलांचा यशस्वी शोध; रावेर पोलीसांची कामगिरी


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर पोलीस ठाण्याच्या पोलीसांच्या अथक प्रयत्नांद्वारे हद्दीतील फुस लाऊन पळवून नेलेल्या दोन अल्पवयीन मुली यांचा मध्यप्रदेश राज्यातून तर दोन अल्पवयीन मुले व दोन अल्पवयीन मुली यांना ओडीसा राज्यातून असे एकुण सहा अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यास पोलीसांना आले यश आले आहे.

रावेर पोलीस ठाणे हद्दीतील अल्पवयीन मुले, मुलींना कोणीतरी अज्ञात इसमाने काहीतरी फुस लावुन पालकांचे कायदेशिर रखवालीतुन पळुन नेले होते.बाबत फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास चालु असतांना गुप्त बातमीदार, नातेवाईक यांची चौकशी करुन, सिसीटिव्ही फुटेज व तांत्रिक विष्लेशन करुन गुन्ह्यातील अपहरीत मुले व मुलींची माहिती काढुन त्यांना टिकिरी जि. रायगड ओडीसा मकपदारा येथील जंगलामधून गुरन १४८,१४९ बिएनएस कलम १३७(२) प्रमाणे, दाखल गुन्ह्यातील अल्पवयीन दोन मुली व दोन मुले यांचा शोध घेतला. त्यानंतर गुरन १३१ भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ प्रमाणे दाखल गुन्ह्यातील एक मुलगी हिस इंदौर येथुन शोध घेण्यात आला व गुरन १४३ प्रमाणे मधील एक मुलगी नायर ता. खकनार जि. बुऱ्हाणपुर मध्यप्रदेश येथुन ताब्यात घेवुन त्यांना सुखरुप रावेर येथे आणून त्यांना त्यांच्या आई वडीलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले आहे.

कार्यवाही पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधिक्षक जळगांव अशोख नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली रावेर उपनिरीक्षक मनोज महाजन, तुषार पाटील, दिपाली पाटील, पो.हे.कॉ.ईश्वर चव्हाण, सुनिल वंजारी, पो.कॉ.सचिन घुगे, नितीन सपकाळे, श्रीकांत चव्हाण, पो.कॉ.गौरव पाटील (स्थागुशा जळगांव) यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे.


Protected Content

Play sound