तालुकास्तरीय कराटे, तायक्वांदो स्पर्धेत फुले विद्यालयाचे यश

9bcd436c 3601 40d9 8905 b8f303fbf67e

पहुर, ता.जामनेर, प्रतिनिधी | जामनेर येथील लॉर्ड गणेशा स्कूलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शालेय कराटे आणि तायक्वांदो स्पर्धेत येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या व ह्यूई च्यूंग मार्शल आर्ट अॅकडमीच्या विद्यार्थ्यांनी चार सुवर्ण पदके पटकावली आहेत.

 

यास्पर्धेत प्रथम क्रमांक आलेल्या खेळाडूंची जिल्हास्तरीय कराटे आणि तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विजयी विद्यार्थ्यांमध्ये १७ वर्ष वयोगटात- भूषण रमेश मगरे व किरण समाधान घोंगडे, १९ वर्ष वयोगटात- नवल शंकर कोंडे व वैभव थोरात यांनी सुवर्ण पदक मिळवले आहे. सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षक हरिभाऊ राऊत, क्रीडा शिक्षक चंदेश सागर यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष बाबूराव घोंगडे व सर्व संचालक तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती व्ही.व्ही. घोंगडे, मुख्याध्यापक अजय देशमूख व सर्व कर्मचारी यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Protected Content