विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश; एमपीएससीची परिक्षा पुढे ढकलली

पुणे -लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कृषी विभागाच्या २५८ जागा समाविष्ट करण्यासाठी तसेच आयबीपीएस व एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार असल्याने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शरद पावर यांनी देखील पाठिंबा दिला होता. अखेर मुलांच्या आंदोलनाला यश आले असून आयोगाने २५ तारखेला होणारी परीक्षा ही पुढे ढकलली आहे. एमपीएससीने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवरून ही माहिती दिली आहे.

आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्या होत्या. एमपीएससीतर्फे राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ही येणाऱ्या रविवारी २५ ऑगस्ट रोजी घेतली जाणार होती. या परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांचा समावेश करण्यात आला नव्हता. या जागा यात समाविष्ट करण्यात याव्या अशी देखील मागणी स्पर्धा परीक्षार्थ्यांनी केली होती.

मात्र, या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर, २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा २०२४ साठीचे मागणीपत्र शासनाकडून मिळाले नव्हते. त्यामुळे कृषी सेवेतील पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये करता आला नाही. मात्र, मुलांनी या परीक्षेची तयारी केली असल्याने कृषी सेवेच्या मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकर करण्यात येईल असे देखील आयोगाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, एकाच दिवशी एमपीएससीची मुख्य परीक्षा आणि आयबीपीएसची परीक्षा असल्याने २५ तारखेला होणारी परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी मुलांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन सुरू केले होते.

कृषी विभागाच्या २५८ जागा समाविष्ट करण्यासाठी तसेच आयबीपीएस व एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. या साठी मुलांनी पुण्यात सोमवारी रात्री पासून आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलावी यासाठी हे आंदोन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात आता थेट शरद पवार यांनी घेत विद्यार्थ्यांची मागणी आयोगाने मान्य करावी अशी मागणी केली होती. तसेच आंदोलनात विद्यार्थ्यांच्या बाजूने उतरणार असल्याचा इशारा देखील दिला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज बैठक घेतली होती. या बैठकीत या बाबत निर्णय झाला आहे. आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचं जाहीर केले आहे. या बाबत ट्विटरवर माहिती देण्यात आली आहे. आज रोजी आयोजित आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि.२५ ऑगस्ट २०२४ रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. परीक्षेचा दिनांक लवकरात लवकर जाहिर करण्यात येईल. असे आयोगाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content