Home Cities एरंडोल एरंडोल येथील निराधार कुटुंबास आर्थीक मदत; भोई समाज केंद्राचा पुढाकार

एरंडोल येथील निराधार कुटुंबास आर्थीक मदत; भोई समाज केंद्राचा पुढाकार

0
150

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल शहरातील भोई समाजातील निराधान कुटुंबांना भाई समाज मदत केंद्राच्या सहकार्याने समाजातील स्व.रामदास उर्फ छोटू बधा वाल्डे या परिवाराला देण्यात आली.

भोई समाजातील रामदास बुधा वाल्डे यांचे वयाच्या ३६व्या वर्षी २५ जानेवारी रोजी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा आहे. आर्थिक अडचणीत सापडलेल्या या परिवारास भोई मदत केंद्राचे जिल्हा समन्वयक यशवंत शिवदे, महारू शिवदे, एरंडोल येथील राष्ट्रीय भोई एकता संघाचे अध्यक्ष व समन्वयक अशोक मोरे, युवा मंचाचे अध्यक्ष नरेश भोई यांच्या प्रयत्नाने समाजाच्या व्यक्ती कडून मदत जमा करून त्यांच्या पत्नी अनिता वाल्डे यांना रक्कम रुपये २० हजार रूपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी जिल्हा समन्वयक यशवंत शिवदे, महारू शिवदे,जळगाव व एरंडोल अशोक मोरे नरेश भोई,सोनू भोई,किशोर वाल्डे बंटी आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound