बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील वरखेड खुर्द येथील उपसरपच गणेश पाटील यांना ग्रामसेविका पतीकडून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उपसरपंच यांनी गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्याकडे तक्रारी दिली आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बोदवड ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका एम.एम. मुंडे यांनी २८ फेब्रुवारी रोजी मासकि सभा घेण्यासाठी अजेंडा पाठविला होता. परंतू सरपंच यांच्या चुलत भाचा यांचा मृत्यू झाल्याने मासीक सभा रद्द करण्यात आली असे ग्रामपंचायतीच्या शिपाईच्या मार्फत कळविण्यात आले. परंतू ३ मार्च रोजी ग्रामपंचायतीचे महत्वाचे ठराव असलेले प्रोसेडींक बुक हे ग्रामपंचायत शिपाई नितीन टेकाउे याला सह्या घेण्यासाठी ग्रामपंचायत सदस्यांच्या घरी पाठविले. यात काही सदस्यांना गैरप्रकार होत असल्याचे लक्षात आल्यानंतर प्रोसेडींग बुकवर सही न करता तहकूब शब्द लिहिला. यासंदर्भात ४ मार्च रोजी उपसरपंच गणेश पांडूरंग पाटील यांनी “ग्रामपंचायत प्रोसेटिंग बुक महत्वाचे दप्तर असल्यामुळे कोणत्या नियमाअंतर्गत ग्रामपंचायती बाहेर घेऊन जाण्याचा व मिटिंग न घेताच कोऱ्या प्रोसिडिंग वरती सह्या घेण्याचा अधिकार कोणी दिला ” असे विचारले असता ग्रामसेविकेचे पती यांनी मासिक सभेत येवून उपसरपंच यांना “तु का जाब विचारतो ?तुला मी बघून घेईल व तुझ्यावरती केसेस दाखल करेल” अशी धमकी दिली. बेजबाबदार ग्रामसेविका आणि धमकी देणारे ग्रामसेविकेचे पती यांच्यासह सरपंच यांची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार उपसरपंच गणेश पाटील यांनी बोदवड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांच्याकडे केली आहे.