विद्यार्थ्यांनी उत्तुंग स्वप्न पहावे ते साकारण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी -ज्येष्ठ साहित्यिक अशोक कोतवाल

पहूर,  ता. जामनेर प्रतिनिधी । विद्यार्थ्यांनी उत्तुंग स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात साकार होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी, पुस्तकांच्या वाचनातून स्वतःच्या ज्ञानाच्या कक्षा वृद्धिंगत कराव्यात, स्वतःतील उत्तमतेचा शोध घेऊन ‘माणूस ‘बनवण्याचा प्रयत्न करावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक लेखक अशोक कोतवाल यांनी केले. ते पहूर येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात आयोजित ११ व्या जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलनात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. 

जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळातर्फे रविवारी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले . तावडी बोलीचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.  किसन पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले . यावेळी डॉ . किसन  पाटील म्हणाले की , विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी लावली पाहिजे . वाचनामध्ये  स्वतःला घडविण्याचे सामर्थ्य असल्याचेही त्यांनी सांगीतले . बाबुराव आण्णा घोंगडे यांनी संमेलनाचा मान महात्मा फुले शिक्षण संस्थेला दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले .  यावेळी सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केले .प्रारंभी शारदा देवी आणि  ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे हे  होते.यावेळी हभप प्रा. रामकृष्ण पाटील , गोरख सुर्यवंशी , सुकदेव महाजन ,  हरिभाऊ राऊत , सरपंच पती  रामेश्वर पाटील , मनोज जोशी , गणेश पांढरे , तुषार बनकर , कडूबा पाटील , तुकाराम जाधव ग्रामपंचायत सदस्य  राजू जाधव , चेतन रोकडे , आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते . 

विद्यार्थी हरखले –

इ. ७ वीच्या बालभारती  पाठ्यपुस्तकातील ‘ स्वप्न विकणारा माणूस ‘ या पाठाचे लेखक प्रत्यक्ष आपल्याशी संवाद साधत असल्याचे पाहून विद्यार्थी हरखून गेले . ९ वीत शिकत असताना आमच्या शाळेत आलेले कवीवर्य  ना. धो . महानोर यांची  कविता ऐकून मी सुद्धा पहिली कविता लिहीली , आणि आज मी तुमच्या पुढे कवी म्हणून उभा आहे , असे सांगताना त्यांनी मी कसा घडलो ? याचेच आत्मकथन विद्यार्थ्यां समोर मांडले .हे ऐकताना विद्यार्थ्यांसह रसीक श्रोते मंत्रमुग्ध झाले होते .

प्रास्ताविक जामनेर तालुका साहित्य संस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष डी. डी . पाटील यांनी केले . अश्विनी पाटील ,राजेंद्र  सोनवणे , शंकर भामेरे यांनी पाहूण्यांचा परिचय सांगीतला . कल्पना बनकर यांनी सुत्रसंचाल केले . कितीं घोंगडे यांनी आभार मानले .

कथाकथन सत्र

नवी मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यीक डॉ . शैलजा करोडे यांनी कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थान भूषविले .  या सत्रात सादर झालेल्या ज्येष्ठ पत्रकार रमेश बनकर , मीना सैंदाणे यांच्या हृदयस्पर्शी कथांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. कीर्ती घोंगडे यांनी सूत्रसंचालन केले भारत पाटील यांनी आभार मानले .

कवी संमेलन

जामनेर तालुका सांस्कृतिक मंडळ पहूर शाखा उपाध्यक्षा कवयित्री कल्पना बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कवी संमेलनात संतोष साळवे ,पुष्पलता कोळी ,निवृत्तीनाथ कोळी , स्वप्नील खोडपे ,निलेश गांगुर्डे , डी .बी . पांढरे , घनःश्याम भूते , मीना सैंदाने , कडू बाभूळकर , शंकर भामेरे यांच्या सह आर्यन बनकर , स्वाती लहासे , अमृता सोनवणे , पल्लवी घाटे , प्रथमेश लहासे ,  दामीनी शिंपी , जयश्री शिंपी , निकिता घोंगडे , तेजल बनकर , सौरभ कोंडे , श्वेता  सोनवणे ,आर्शिया शेख , महेक पठाण , दर्शिका बनकर ,  यश पवार , भाग्यश्री घोंगडे , प्रेरणा  उबाळे ,  कांचन लहासे आदी बाल कविंनी विविध सामाजिक , राजकिय , शैक्षणिक , भावनिक  विषयांवर हृदयस्पर्शी कविता सादर केल्या .या सत्राचे सूत्रसंचालन अश्विनी पाटील यांनी केले . आभार शंकर भामेरे यांनी मानले .यावेळी जिल्हास्तरीय काव्यलेखन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यशस्वीतेसाठी  मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले . जिल्हाभरातील साहित्यरसिक  मोठ्या संख्येने संमेलनात सहभागी झाले होते .

 

Protected Content