मूल्यवर्धन कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांनी जबाबदार व कर्तबगार नागरिक बनावे – शिक्षीका ज्योती जाधव

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यशासन व शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन व्दारा पुणे येथे आयोजित मूल्यवर्धन कार्यक्रम २०१७ नुसार शालेय शिक्षण विभागामार्फत संपूर्ण राज्यात प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. या प्रशिक्षणात सहभाग घेणाऱ्या शिक्षीका ज्योती जाधव यांनी लाईव्ह ट्रेंड न्यूजशी बोलतांना आपले मनोगत व्यक्त केले आहे. यावेळी बोलतांना शिक्षीका ज्योती जाधव यांनी म्हटले आहे की, शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून सदरील प्रशिक्षणामुळे तसेच मूल्यवर्धन मेळावा आशा विविध आयोजित कार्यक्रमामुळे शिक्षकांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळण्यास मदत होत आहे.

मूल्यवर्धन कार्यक्रमानुसार जबाबदार संवेदनशील व कर्तबगार नागरिक बनावे म्हणून मूल्यवर्धन उपक्रमांद्वारे स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यास मदत होत आहे आणि मूल्यवर्धन उपक्रम बालस्नेही व विद्यार्थी केन्द्रित असल्याकारणाने सहयोगी अध्ययन, अध्यापन व ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धतीचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सोपे झाले आहे. त्याचप्रमाणे अभ्यासक्रम व मूल्यवर्धन यांच्यामध्ये सहसंबंध जोडून अध्यापन केल्यामुळे मुले ही नैसर्गिकरीत्या मूल्य स्वीकारत आहेत. परिणामी मुले केवळ परीक्षार्थी न बनता त्यांचा नैतिक व भावनिक विकास होऊन मुले भावी सुजान नागरिक बनू शकतील अशी अपेक्षा अतिदुर्गम अशा सातपुडा पर्वताच्या कुशीत असलेल्या यावल तालुक्यातील काळाडोह या गावपाडया वरील जिल्हा परिषदच्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या शिक्षीका ज्योती लक्ष्मण जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Protected Content