Home Cities यावल किनगावच्या इंग्लीश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

किनगावच्या इंग्लीश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत यश

0
35

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनीधी | तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडियम निवासी स्कुलच्या विद्यार्थी खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धेत उत्तम यश संपादन करत विभागीय स्पर्धेतील सहभाग निश्‍चीत केला आहे.

श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे दि.९ रोजी झालेल्या धावणे(रनिंग)१०० मिटर रनिंग स्पर्धेत रोहन शिवा पावरा तर ८० मिटर हर्डल स्पर्धेत साहिल इरमल बारेला यांनी यश प्राप्त करत विभागीय स्तरावर मजल मारली आहे. तसेच दि.१० रोजी झालेल्या जिल्हास्तरीय वुशू स्पर्धेत निलम रेबा बारेला(प्रथम)शिवम कैलाश बारेला (प्रथम)रोशन रमेश बारेला (प्रथम) जुबेर बशीर तडवी (प्रथम) सद्दाम तडवी (द्वितीय) रोहन शिवा पावरा (द्वितीय)विकास पावरा (द्वितीय)चरण रमेश पाटील (द्वितीय) ममता बारेला (द्वितीय) नजराना तडवी (तृतीय)आश्या प्रकारे यश प्राप्त केले.

यातील प्रथम क्रमांकाने विजयी खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांना कोच तुषार जाधव, क्रिडा शिक्षक व यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले.

विजयी सर्व खेळाडुंसह कोच व क्रिडा शिक्षक यांचे चेअरमन विजयकुमार देवचंद पाटील, व्हा.चेअरमन सौ.शैलेजाताई विजयकुमार पाटील, सचिव मनिष विजकुमार पाटील, व्यवस्थापीका सौ.पुनम मनिष पाटील, प्राचार्य अशोक प्रतापसिंग पाटील, उप प्राचार्य सौ.राजश्री सुभाष अहिरराव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करत विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


Protected Content

Play sound