अमळनेर (प्रतिनिधी) दोंडाईचा येथे होणाऱ्या राष्ट्रीय सुवर्णबाण पुरस्कार पात्रता परीक्षेसाठी पिंगेवाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील स्वामी विवेकानंद पथकातील विद्यार्थी रवाना नुकतेच झाले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांना बस स्थानकावर शुभेच्छा देण्यासाठी शिक्षकमंडळी उपस्थित होती.
दोंडाईचा येथील हस्ती पब्लिक स्कूलमध्ये दि 15 मार्च ते 17 मार्च 2019 दरम्यान राष्ट्रीयस्तर सुवर्णबाण पुरस्कार पात्रता परीक्षा तथा राज्यस्तरीय चतुर्थ चरण पुरस्कार चाचणी शिबिर होत आहे. त्यासाठी पिंगेवाडी येथील विद्यार्थी नुकतेच रवाना झाले आहेत. त्यांना नुकत्याच शाळेच्या मुख्याध्यापिका आदर्श शिक्षिका वंदना ठेंग व शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या. दरवर्षाला पिंगळवाडे उच्च प्राथमिक व प्राथमिक शाळेतील शिक्षक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असतात. त्यामुळे या शाळेचा जळगाव जिल्ह्यातील एक उपक्रमशील शाळा म्हणून अनेक वेळा मान्यवरांच्या हस्ते गौरवही झालेला आहे. शिबिरासाठी गेलेल्या विद्यार्थांमध्ये कल्पेश ज्ञानेश्वर पाटील, साई किरण पाटील, हिमांशू शरद पाटील, रोहन राजेंद्र भिल, दिग्विजय नितीन पाटील,अनुराग सुनील पाटील,सर्वज्ञ चंद्रशेखर सूर्यवंशी हे विद्यार्थी रवाना झाले आहेत. या विद्यार्थ्यांना बस स्थानकावर शुभेच्छा देण्यासाठी उपक्रमशील जिल्हा परिषद आदर्श शिक्षक दत्तात्रय सोनवणे, मुख्याध्यापिका श्रीमती वंदना ठेंग व शिक्षक प्रवीण पाटील ,उपशिक्षक रवींद्र पाटील व पालक उपस्थित होते.