Home Cities जळगाव विद्यार्थ्यांनी घेतली नगरसेवकाची मुलाखत

विद्यार्थ्यांनी घेतली नगरसेवकाची मुलाखत

0
160


interview

जळगाव प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दि. 13 ऑगस्ट रोजी शालेय उपक्रम अंतर्गत प्रभाक क्रमांक 12 मधील नगरसेवक अनंत जोशी यांची मुलाखत घेतली आहे.

याबाबत माहिती अशी की, विद्यार्थ्यांनी यावेळी नगरसेवक यांना विविध प्रश्न विचारले. जसे, आपण प्रभागातील कामे कशी सोडवतात, कोण-कोण ती कामे केली जातात, आपल्या स्वप्नातला वार्ड कसा आहे, महापौर झाल्यास काय कामे करावी लागतात, शहरातीळ रस्ते इतके खराब का आहेत ? असे विविध प्रश्नानांची अनंत जोशी यांनी दिलखुलास उत्तर दिली आहेत. विद्यार्थ्यांना स्थानिक शासन संस्था यांची माहिती मिळावी. महापालिका व नगरसेवक यांची कामे समजावी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद इसे यांनी तर परिचय पूजा साळवी यांनी करून दिला. या प्रसंगी केतन वाघ, योगेश जोशी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.


Protected Content

Play sound