भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गरीब वस्तीतील नागरिकांना घरातील चांगले कपडे व दिवाळी फराळाचे वाटप करण्याचा उपक्रम राबविला. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरीब नागरीकांना दिवाळीचा फराळ तसेच कपडे मिळावे या उद्दात हेतूने ताप्ती पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या घरातील चांगले कपडे व दिवाळीचे फराळ एकत्रित केला. साधारण पाचशे ते सातशे कपडे व ३५ ते ४० किलो दिवाळीसाठी लागणारे फराळ एकत्रित केला. हे त्यांनी गेल्या तीन दिवसात विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी जमा करून गुरुवारी गंगापूरी येथे गरीब वस्तीतील नागरिकांना व लहान मुलांना व महिलांना कपडे साड्या दिवाळीचे फराळ वाटप केले. त्यानंतर भुसावळातील राहूल नगर जवळील वस्तीत उरलेले कपडे व फराळ गरीब नागरिकांना व लहान मुलांना देण्यात आले. यावेळी ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर सोबत त्यांचे शिक्षक गोपाल जोनवाल, अर्जुन सणस, विजय संकत, निलेश फंड, डॅनिअल पवार, रचना महाजन, सोनिया टेकवानी, शेफाली श्रीवास्तव आदी उपस्थित होते. यावेळी शाळेच्या प्रिन्सिपल निना कटलर म्हणाल्या की, आमची शाळा गेल्या कित्येक वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे व आमच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना असले उपक्रम राबवण्यासाठी आनंद वाटतो. जेणेकरून गरीब वस्तीपर्यंत घरोघरी दिवाळीचा फराळ गेला पाहिजे असं ध्येय आमच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी हा आगळावेगळा उपक्रम केल्याने शहरात चर्चा होत आहे.