जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत निवेदन करतांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात बाबतीत अपशब्द वापरल्याने सर्व देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत. याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना कार्यालय ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जाऊन बाबा साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करून वक्तव्याचा निषेध करण्यात आला.
यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, काँग्रेस महानगर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, अल्पसंख्यांक आघाडी महानगर प्रमुख जाकिर पठाण, सरचिटणीस दीपक सोनवणे, राहुल भालेराव, महिला आघाडी महानगर प्रमुख मनीषा पाटील, निता सांगोळे, उप महानगर प्रमुख गणेश गायकवाड, प्रकाश बेदमुथा, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे, विभाग प्रमुख किरण भावसार, सलीम खाटीक, शोएब खाटीक, हर्षल मुंडे, शरीफ रंग्रेज, राधे बाविस्कर, पप्पू तायडे, राकेश माळी, कलीम खान, प्रकाश पाटील, शफी बागवान, रवी चौधरी, मुजिफ पटेल, आण्णा जाधव, किरण अडकमोल, मालोजी पाटील, अरुणा पाटील, मीनाक्षी जावळे, युवासेना महानगर प्रमुख यश सपकाळे, उप महानगर प्रमुख गिरीश कोल्हे, बाळा कंखरे, आण्णा भोईटे, बापू नेने, ताराचंद पाटील, कैलास सोनवणे, मिलिंद पगारे, आण्णा जाधव आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.