पाचोऱ्यात वाल्मिक कराडविरोधात तीव्र आंदोलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण पाचोरा तालुक्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेतील मुख्य सुत्रधार म्हणून वाल्मिक कराड याचे नाव समोर येताच शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना (शिंदे गट) युवासेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी वाल्मिक कराड याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारून त्याचे दहन केले. आंदोलकांनी “वाल्मिक कराडला फाशी द्या” अशा जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात उपजिल्हा प्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख अनिल (टिल्लु अप्पा) पाटील, शहरप्रमुख भोला पाटील, सुरज शिंदे, सुमित पाटील, गणेश चौधरी, अतुल चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते. युवासेनेच्या वतीने पोलिस निरीक्षक अशोक पवार यांना निवेदन देऊन वाल्मिक कराड याला फाशीची कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Protected Content